उस्मानाबाद /प्रतिनिधी
 महाराष्ट्रात कोरुंनाच संकट हाताळण्यात तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरले असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करून आता 12 आठवडे झाले तरी देशात सर्वाधिक करुणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात सर्वाधिक वाढत आहे .या कालावधीमध्ये गोरगरीब व मजूर यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे उपासमारीला सामोरे जावे लागले. पुणे व मुंबईसारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पालघर, नांदेड व बीड येथे साधु-संत व नागरिकांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री व गृहमंत्री मूग गिळून गप्प बसले .राज्यातील सर्व उद्योगधंदे लॉक डाऊन च्या काळात बंद पडल्यामुळे बेरोजगारांची संख्या लाखोंनी वाढली. विकासाच्या सर्वच क्षेत्रात या सरकारने अस्थिरता निर्माण केली आहे .राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे .शेतकरी, शेतमजूर ,कष्टकरी कामगार या सरकारने उध्वस्त केला आहे. काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकारच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत उद्धव ठाकरे बसले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सरकार चालवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारमध्ये कोणाचाच कोणात ताळमेळ नसल्यामुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असेल तर राज्यपाल राज्यकारभारात हस्तक्षेप करू शकतात हे घटनेतच नमूद केले आहे. त्यामुळे राज्यपाल या घटनात्मक पदाबाबत दररोज बेजबाबदार वक्तव्य करून महाविकास आघाडीतील तथाकथीत पुढारी स्वतःचे हसे करून घेत आहेत .त्यामुळे आता सर्व स्तरावर अपयशी ठरलेले महाराष्ट्र सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.
 
Top