उस्मानाबाद/प्रतिनिधी -
आ.राणाजगजितसिंह पाटील आणि आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे अन्नछत्र सुरू आहे. कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या गरीब नागरिकांचे अन्नाअभावी हाल होत आहेत. अशा गरजू लोकांसाठी सदरील अन्नछत्र सुरु करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज सायंकाळी पोळी भाजी व इतर शिजवलेल्या अन्नाचे ६०० डबे उस्मानाबाद शहरातील गरजूंना पोहोचविण्याचे नियोजन याद्वारे करण्यात आले आहे.
जि. प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते साहेब यांनी प्रतिष्ठाण भवन, उस्मानाबाद येथील अन्नछत्रास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे   यांनी मान्यवरांना सदरील उपक्रमाची माहिती दिली.  त्यानंतर जि. प.अध्यक्षा  कांबळे व सीईओ डॉ. कोलते यांच्या हस्ते प्रत्येकी एका गरजूला जेवणाचे पॅकेट देण्यात आले. गरजू लोकांसाठी हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे साहेब, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बापू पवार, शिवाजी पंगुडवाले, दत्ता पेठे, लक्ष्मण माने, आदी उपस्थित होते.
 
Top