उमरगा /प्रतिनिधी-
सद्या देशात कोरोणाचे महाभयंकर संकट आहे. अशा संकट समयी सामाजीक बांधिलकी  म्हणून महाराष्ट्र  राज्य  प्राथमिक  शिक्षक  समिती उमरगाच्यावतीने अति गरजू लोकांना 251 धान्य किटचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौगुले, उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, युवानेते किरण गायकवाड, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे, विभागीय उपाध्यक्ष शिवाजी कवाळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बनसोडे, सरचिटणीस उमेश खोसे, शिक्षक पतसंस्था चेअरमन बिभीषण सुरवसे, सचिव शांताराम गायकवाड यांच्या हस्ते तीन धान्य किट वाटप करून सुरवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उमरगा शाखेच्यावतीने तालुक्यातील शिक्षक बांधवाना कोविड-19 मुळे उपासमार होत असलेल्या कुटूंबाना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने धान्य किट वाटप करण्यासाठी आवाहन करण्यात आले. किट वाटप करण्यासाठी आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील शिक्षक बांधवांनी 251 किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.
यासाठी शिक्षक समिती पदाधिकारी यांनी सर्व किट तयार करण्यासाठी प्रयत्न केले. यात कार्याध्यक्ष परमेश्वर साखरे, शिवकुमार स्वामी, बळीराम घोरवाडे, गोविंद कुंभार, रविंद्र सूर्यवंशी, गणेश सुंकेवार, गजेंद्र कांबळे, उमाचंद्र सूर्यवंशी, मोहन सालेगावकर, सदानंद कुंभार, शाहूराज चव्हाण, राजेंद्र राठोड, अमोल थोरे, संजय लिंबारे, इब्राहिम चौधरी, पाटील गणपत, किशोरकुमार गायकवाड  यांनी किट बनवून वाटप केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक  समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील शिक्षक बांधवांनी आपापल्या परिसरात यापूर्वीच किटचे वाटप करण्यासाठी मदत निधी दिले आहेत. त्याबरोबरच गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मदत निधी जमा केलेले आहेत. कांही शिक्षक  गावपातळीवरील नियोजन करून गरजू कुटूंबाना वाटप केलेले आहेत. तसेच एक दिवसाचा पगार मुख्यमंञी सहाय्यता निधीसाठी दिलेले आहेत. समितीच्या किट वाटपास प्रतिसाद देत  शिक्षक  बांधवांनी सामाजिक  बांधिलकी म्हणून भरघोस  सहकार्य  केले.
उमरगा तालुक्यातील ज्या गरजू लोकांना  मदतीची गरज होती अशा कुटूंबापर्यंत त्यांच्या  गावी जाऊन किटचे वाटप करण्यात  येत आहे.तालुक्याच वेगळेपण जपत  मुख्यमंञी साह्यता निधीसाठी शिक्षक समितीच्या ताब्यात असलेल्या उमरगा तालुका शिक्षक  पतसंस्थेमार्फत एक लाख पंचवीस हजार  रु. चा धनादेश  जमा करण्यात  आलेला  आहे.
शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील शिक्षक बांधवांची मोफत कामे करून यापूर्वीच समितीने महाराष्ट्रात आदर्श घालून दिलेला आहे. तसेच तालुक्यातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करणे, वृक्षारोपण करणे, वेगवेगळे कार्य करत राजकारणा बरोबरच समाजकारण करत आहेत. नक्किच एक आदर्श काम शिक्षक समितीच्या मार्फत होत असलेले पाहून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
 
Top