तुळजापूर / प्रतिनिधी-
 तुळजापूर खुर्द भागातील शिवरत्ननगर मध्ये पाण्याची सोय नसल्याने या भागातील रहिवासी पाणीटंचाईने ञस्त झाले असुन या भागात पाण्याची सोय करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली.
निवेदनात म्हटलं आहेकी तुळजापूर खुर्द भागात बायपास रस्ता परिसरात शिवरत्न नगर असुन येथे पाण्याची कुठलीही सोय नसल्याने सध्या या भागातील रहिवाशांना लेकराबाळासह भर उन्हात पाण्याचा शोधात भटकावे लागत आहे.तुळजापूर खुर्द मधील शिवरत्न चा पुढे असणाऱ्या भागात पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिलेली आहे व उर्वरीत तुळजापूर खुर्द भागात मुबलक पाणीपुरवठा असताना हा भाग पिण्याचा पाण्यापासुन वंचित ठेवला आहे.  पिण्याचा पाण्या बाबतीत तुळजापूर खुर्द भागात दुजाभाव केला जात असल्या बद्दल रहिवाशांन मध्ये तीव्र संताप व्यक्त होत असुन या भागात पंधरा दिवसाचा आत पाणीपुरवठा उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इषारा या भागातील शेकडो रहिवाशांनी दिला आहे याची ऐक प्रत माहीतीस्तव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.

 
Top