तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील खडकी येथील अजिंक्य बहुउद्देशिय सेवाभावी सामाजिक संस्था,महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंत्तीनिमित्त १००० लोकांना अन्नदान (फुड पँकेट) वाटप करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर  राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची जंयत्ती साधेपणाने  साजरी करुन  यातुन वाचालेल्या खर्चातुन  1000 गरजु लोकांना जेवण वाटप करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला व हे फुड पाँकेट सोलापुर एमआयडीसी कामगार भागात वाटप केले असल्याचे राम जवान यांनी सांगितले.

 
Top