तुळजापूर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात वाढत्या कोरोना चा प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी उपविभागीयपोलीसअधिकारी कार्यालय  तुळजापूर अंतर्गत तुळजापूर नळदुर्ग तामलवाडी भागातील 130 गावात एक गाव-एक पोलिस  कर्मचारी अशी नेमणूक करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने नेमुन दिलेल्या गावात कोरोना पसरु नये याची जबाबदारी त्याचावर सोपवली आहे.संबंधित गावातील पोलिस पाटील,  कोरोना वाँरीयर्स,  ग्रामसेवक ,  ग्रामपंचायत शिपाई  यांच्या मदतीने गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. गावात सोशल डिस्टंन्सिंग न पाळणा-यावर इसमांवर कारवाई करण्यात येणार आहे.सदर नेमुन दिलेल्या गावात पोलिस महसुल कर्मचारी गावात नेमलेल्या कोरोना वाँरीयर्स मदतीने कोरोना संसर्ग पासुन बचाव होणार आहे. तुळजापूर नळदुर्ग तामलवडी येथील अधिकारींना  एक पोलिस कर्मचारी माध्यमातून कोरोना संसर्ग पासुन नियंत्रण आणण्यासाठी काटेकोरपणे कायदा ची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. दिलीप टिपरसे यांनी तुळजापूर उपविभागात राबविण्याचे   आदेश दिले आहेत.
 असे होईल  कामकाज  
वारंवार गावांना भेट देऊन पोलिस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे मनोबल उंचावणे,  क्वारटांईन बाबतीत योग्य ती दक्षता घेणे, कोरोना बाबतीत तक्रारी आल्यास तात्काळ वरिषठांना कळवून निवारण करणे, गावात आलेल्यांची माहीती लपविल्यास कारवाई करणे, होम क्वारटांईन व्यक्ती वर देखरेख करणे, होम क्वारटांईन कक्षास वारंवार भेटी देणे, मास्क न वापरणे व नियम न पाळणा-यांनवर कारवाई करणे
 
Top