उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात जाहीर झालेला  लॉक डाउन आज चोथ्या टप्प्यात पोहोचला आहे सुरुवातीला ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोन वर पोहोचला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह च्या या सर्व प्रकारात मात्र सामान्य जनतेच्या फरफट होताना दिसत आहे त्यात पवित्र रमजान महिना संपण्याच्या मार्गावर असून पुढील दोन दिवसात ईद आहे सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांची जगण्यासाठी कसरत त्यातही ईद सगळा प्रपंचाचा यक्ष प्रश्न,या परिवारांच्या आर्थिक परिस्तिथीचा विचार करून  उस्मानाबाद जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्तिमत्व मसूद शेख व त्यांचे सहकारी शेख अयाज उर्फ बबलू,बिलाल भाई तांबोळी,वाजीद भाई पठाण यांनी उस्मानाबाद शहर व आजूबाजूतील 1200 गरजू परिवाराना रफत कोतवाल,उस्मान भाई मित्र परिवार,इर्शाद भाई वन अधिकारी व अन्सार रजवी या दानशूरांच्या सहकार्याने गरिबांची  ईद निर्विघन पार पडावी याच उद्देशाने  शिरखुर्मा किट वाटपाचा निर्णय घेतला व सर्व 1200 किटची पूर्तता करून  उस्मानाबाद शहरातील साराह कॅम्पस हाय स्कूल येथे उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन सर,उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी साहेब यांच्या हस्ते सोशल डिस्टनसिंग च्या माध्यमातून 5 गरजू परिवाराना शिरखुर्मा किट देऊन या संकल्पनेचा  शुभारंभ करण्यात आला बाकी किट गरजू परिवाराना घरपोच देण्याची व्यवस्था हि करण्यात आली यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दगु भाई शेख साहेब,नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे साहेब, शहर पोलीस निरीक्षक घाडगे साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब मदरसा दावतुल उलूम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रसूल शेख,सचिव पैगंबर शेख,संचालक बाबा फैजोद्दीन कर सल्लागार लतीफ शेख व इतर लोक उपस्तिथ होते.
या उपक्रमामुळे गरजू परिवाराची रमजान ईद साजरी होण्यास मदत झाली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top