परंडा/प्रतिनिधी-
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची व मृत्युंची संख्या वाढत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार परस्थितीशी मुकाबला करण्यास असमर्थ व अपयशी ठरले असून मंञी ,अधिकारी यांच्यात समन्वय नाही.कोणाचा कोणाला पायपोस नाही.राज्यकर्ते बेलगाम वागत आहेत. महाराष्ट्र संकटात आणि राज्यकर्ते कुंभकर्णी अवस्थेत आहेत,असा आरोप करुन आता तरी महाराष्ट्राच्या जनतेला केंद्र व अन्य राज्याप्रमाणे मदतीचे पॅकेज द्या,अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ,विधानपरिषदेचे मुख्यप्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना महामारी संकटाच्या काळात अपयशी ठरलेल्या राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी तसेच राज्यातील जनतेला केंद्र व अन्य राज्याप्रमाणे मदतीचे ५०हजार कोटींचे पॅकेज देऊन जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी माझे अंगण हेच रणांगण आंदोलन करण्यात आले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व विधानपरिषदेचे मुख्यप्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सहका-यांसमवेत परंडा येथे संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारचे अपयश व निष्क्रियतेवर घणाघाती हल्ला केला.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२ हजाराला तर मृतांचा आकडा १५००ला गेला असून दिवसेंदिवस हा आकडा मोठ्या संख्येने वाढत असून सरकाच्या नियोजन शून्य कारभारामुळे कोरोनाग्रस्तांचे लोण आता गावखेड्यात पोहचत आहे. तरीही सरकारला याचे गांभीर्य नाही. राज्यात शासन आणि प्रशासकीय यंञणेत ताळमेळ नाही. एक मंञी निर्णय घेतो तर दुसरा असे काही नाही सांगतो. अधिकारी परस्पर निर्णय बदलतात. रेशनच्या धान्य वाटपात झालेला गोंधळ,सरकारने तीन वेळा बदलेले नियम,अधिकारी एक तर मंञी भलतेच आकडे सांगतात राज्यातील शेतकरी,मजूर,कामगार,हातावर पोट असणारे,बलुतेदार,यांची झालेली अवस्था. लोकांनी गावी जाण्यासाठी केलेली पायपीट. बस मोफत देतो म्हणून राञीत चारपट भाडे करुन गरीबांची थट्टा केली. कोणाचा कोणावर अंकुश नाही. बेलगामपणे वागत आहेत. राज्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधीक वाढतो आहे. सरकार बेफीकीर आहे. लाँकडाऊनमध्ये गृहसचिव धनदांडग्या गुन्हेगारांना पासची सोय करुन हिल स्टेशनला पाठवतात. याची गृहमंञ्यांना खबर नाही. पोलीसांवर जिवघेणे हल्ले , साधुंची पोलीसांच्या साक्षीने निघृण हत्या , महिलांवर अत्याचार होत असून कायदा सुव्यवस्थे बरोबरच आरोग्य व्यवस्था वेशीवर टांगली आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी वास्तव मांडणा-यांना ,पञकारांना बळीचा बकरा बनवले जात आहे. यामुळे कितीही झाकले तरी कोंबडा आरवण्याचे रहात नाही. महाराष्ट्रातील जनतेला राज्यात मायबाप सरकार नावाचे काही अस्तीत्वात आहे का? अहि प्रश्न करुन राज्यातील सरकारचे काम रामभरोसे चालले असून उडाला तर पक्षी , नाहीतर बेडूक अशी अवस्था असल्याचा घणाघात आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केला.
  उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा स्वनिधीतून रेशनकार्ड  नसलेल्या १० हजार गरीब गरजूंना धान्य व मदतीचे किट देण्याचा प्रस्ताव नामंजूर करुन माञ नंतर आलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अशाच प्रस्तावाला मंजूरी देऊन दुजाभाव करुन राज्यसरकारने दळभद्री राजकारण केल्याचा आरोप करुन आमदार ठाकूर यांनी सर्व दुध उत्पादकांना फडणवीस सरकारच्या काळात दिले जाणारे प्रती लिटर ५ रुपये अनुदान थांबविले . या अडचणीच्या काळात केवळ सहकारी संघाकडून तेही मर्यादित दूध उत्पादकांनाच अनुदान देण्याचा निर्णय केला.उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यातील अन्येक जिल्ह्यांत सहकारी संघच अस्तित्वात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी अवर्षण, दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे आधीच हैराण असलेल्या शेतकऱ्यांचे तीन-चार वेळा झालेल्या वादळीवारा, अवकाळी पाऊस, गारपीटीने रब्बी तसेच फळबागा, पालेभाज्यांचे आतोनात नुकसान होऊनही कसलीच मदत नाही. राज्यसरकारच्या फसव्या कर्जमाफीचे बँकांना पैसे न दिल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याचे म्हटले आहे.
 ा कोरोना लाँकडाऊन च्या संकटकाळात केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करुन समाजातील मोठ्या वर्गाला मदत देऊन दिलासा देण्याचे काम केले. अन्य राज्यांनीही आपल्या जनतेला मदतीचे पॅकेज जाहीर केले. माञ महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारने दोन महीने उलटूनही नया पैश्याची मदत वा कसलेही पँकेज दिले नाही. सरकारने जनतेच्या सहनशिलतेचा अंत न पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला काय मदत केली हे जाहीरपणे सांगण्याचे आव्हान करुन आतातरी आणखी लोक मरण्याची वाट न पाहता राज्याने शेतकरी, मजूर, कामगार, निराधार, विधवा, अपंग, छोटे व्यावसायिक, हातावरचे पोट असणारे, अलुतेदार, बलुतेदार, वेगवेगळे घटक यांच्यासाठी ५० हजार कोटीचे मदतीचे पॅकेज देण्याची मागणी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष अॕड.झहीर चौधरी, गणेश राशीनकर, श्रीकांत सानप उपस्थित होते.
 
Top