तेर (प्रतिनिधी )कोरोना बाधीत देश असलेल्या लंडन येथून परदेशवारी करून  आलेल्या तेर ता.उस्मानाबाद  येथील दांपत्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते.11 मे ला त्यांचे नमुने निगेटीव आले आहेत. 
उस्मानाबाद तालुक्यातील तेर  ता.उस्मानाबाद येथील  पती वय  63, पत्नी वय 55 हे दांपत्य भारतातून लंडन येथे असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते परंतु .कोरोना या महाभयंकर महामारीमुळे त्याठिकाणीच रहावे लागले  होते .भारत  सरकारच्या धोरणानुसार ते भारतात परतले. हे  दांपत्य  कोरोना बाधीत लंडन देशातून प्रवास करून आले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा हा कोरोना मुक्त जिल्हा असून ग्रीन झोन मध्ये आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दोघांना  रवीवार .10 मे रोजी दुपारी   तेर येथील ग्रामीण रूग्णालयात  तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. या दोघांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. दरम्यान या दोघांनाही कोरोना संबधीत लक्षणे आढळून आलेले नाहीत  .तरीही खबरदारी म्हणून स्वॅबचे नमुने घेऊन  तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.  या दोघांनाही तेर येथील ग्रामीण रूग्णालयातील कोरोना कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. 11 मे ला दोघांचे स्लँबचे नमुने निगेटीव आले  असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी  डॉ.विजय विश्वकर्मा  यांनी दिली.
 
Top