लोहारा/प्रतिनिधी
कोरोना विषाणूने थैमान घातले असुन देशभरात ४६ दिवसापासून लॉकडाऊन आहे. हातावर पोट असलेल्या कुंटुंबाच्या  हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे. लोहारा शहरातील अशा भावसार समाज कुटुंबाना हिंगुलांबिका भावसार समाज चॅरिटेबल ट्रस्ट - ४७० यांच्यावतीने गरीब व वंचित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. संचारबंदीत भावसार कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी समाज अध्यक्ष झिंगाडे शिवराज, नगरसेवक गगन माळवदकर, सहसचिव माळवदकर राजेंद्र, माळवदकर नागेश, झिंगाडे गंगाधर व समस्त भावसार समाज बांधवानी उत्स्फुर्त सहकार्य केले.
 
Top