उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणारया डॉक्टर सोबत प्रत्येक गावामध्ये आशा वर्कर ही डोअर टू डोअर जाऊन सर्वे करत आहेत त्यांना  मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे वतीने उस्मानाबाद शहर आणि जिल्हयातील  1260 आशा वर्कर्स ना फेसशिल्ड देण्यात आले. हा अनौपचारिक कार्यक्रम सोमवार 18 मे २०२० रोजी  2.00 वाजता गोरे कॉम्प्लेक्स समता नगर येथे झाला.राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे यांनी ही माहिती दिली.
 यावेळी राष्ट्रवादीचे नेते मा जीवनराव गोरे ,जिल्हाध्यक्ष  सुरेश दाजी बिराजदार, संजय निंबाळकर ,संपतराव डोके, नंदकुमार गवारे, नितीन बागल , आदित्य गोरे, प्रतापसिंह भैय्या पाटी, वैभव मोरे उपस्थित होते व त्यांच्या हातून या शील्ड चे वाटप करण्यात आले.पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार. मा.  अजित पवार  खा. सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री  श्री राजेश टोपे ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात आरोग्य सेवकांना फेस शील्ड चे वाटप केले जात आहे.‘कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व आरोग्य सेवकांना फेस शिल्ड देण्यात येत आहे.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिवळे सर, डॉक्टर महेश गुरव व काही आशा वर्कस उपस्थित होते.यासोबत सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथील नर्सेस ना पण फेस शील्ड चे वाटप करण्यात  येईल असे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश तांबारे यांनी सांगितले..
 
Top