तेर (प्रतिनिधी )
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे भरवस्तीत उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टावरच्या कामाला  परवानगी देण्यात येऊ नये टावर उभारणीस परवानगी दिल्यास  आंदोलन करण्याचा इशारा तेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला  निवेदनाद्वारे दिला आहे.
तेर ता. उस्मानाबाद येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मोबाईलचे टावर बसविण्यात येत आहे त्यामुळे या टावरमुळे लहामुलासह वृध्द आजारी व्यक्तीसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे .त्यामुळे टावर बसविण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे दिला आहे.

 
Top