उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या गावास खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील यांची भेट
उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी भागात, तुळजापूर शहरातील भोसले गल्ली, लोहारा तालुक्यातील जेवळी येथे पुणे मुंबई वरून आलेल्या व्यक्तीं कोरोना बाधित आढळल्याने आवश्यक त्या केलेल्या उपायोजनाची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खासदार साहेबांनी प्रतिबंधक भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुणे-मुंबई वरून नागरिक शहरात व ग्रामीण भागात आपल्या स्वगृही परतत आहेत अशा व्यक्तींची प्रशासनाने नोंद घेऊन त्यांची प्रशासनाने अशा नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांना शक्यतो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाने करावी. या भागातील नागरिकांनी हि प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. तसेच जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनातील सर्व कर्मचारी काम करताना स्वतः काळजी घ्या असे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्ष नंदु (भैय्या) राजेनिंबाळकर, लोहारा तालुका प्रमुख मोहन पनुरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार विजय अवदाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलिस निरिक्षक  चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चौरे, पीआय  गवळी  , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. येवले, डॉ. पवार, डॉ. अशोक कठारे, नगरपालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे,   जमाले तसेच आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top