उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड 19 स्वॅब टेस्टिंग लॅब साठी जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या माध्यमातून निधी उभारून तो निधी  जिल्हाधिकारी यांना लॅब उभारणीसाठी देण्यात येणार आहे. जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पुढाकारातून हा निधी जमा होत असल्याने श्री सिद्धिविनायक जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या वतीने 51000 हजार रुपयाचा  निधी लॅब उभारणीसाठी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  सतीश दंडनाईक यांना देण्यात आला.
यावेळी श्री सिद्धिविनायक परिवाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे, मुख्य लेखाधिकारी  राजकुमार जाधव, शाखा वयवस्थापक अरविंद गोरे उपस्थित होते.

 
Top