तुळजापूर  /प्रतिनिधी
उस्मानाबाद -सोलापूर च्या सिमेवर  असणाऱ्या खडकी गावामध्ये रोजगार हमीच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी. कोरोनासारख्या महा भयंकर आजारातून लोकांच्या हाताला काम देऊन दिलासा द्यावा अशी मागणी अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम जवान व संस्थेचे सचिव तथा महा एनजीओ फेडरेशनचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक राम जवान यांनी केली आहे.
खडकी हे गाव उस्मानाबाद व सोलापुर या दोन जिल्हाच्या सिमेवर आहे. सोलापूर जिल्ह्यातील द सोलापुर तालुक्यातील उळे या गावामध्ये व्यक्ती कोरोना पाँझिटिव्ह सापडल्याने उळे परिसरातील सात किलोमीटर अंतरावरील गावे बफर झोन मध्ये आली आहेत. त्यामध्ये खडकी गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावातील लोकांना गेल्या दोन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे.  खडकी हे गाव दुष्काळी पट्टातील गाव आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने गावातील लोकांना सोलापुर सारख्या शहरात दररोज कामाला जात होते. पण शासनाचा जिल्हा बंदीचा आदेश असल्याने
लोकांना कामासाठी बाहेरगावी जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकांना तात्काळ गावातच रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

 
Top