तुळजापूर /प्रतिनिधी-
 जिल्ह्यात ,तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवार,दि.19 मे पासुन  अखेर दारू विक्रीस सुरुवात करण्यात आल्याने  या निर्णयाचे मद्यप्रेमीनी जोरदार स्वागत केल्याचे दिसून येत आहे.  उस्मानाबाद जिल्हयात आता  सोमवार  ते शनिवार सकाळी 8 ते 2 दुपारी  या वेळेतच दारू विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.रविवारी माञ सुट्टी असणार आहे.
माञ ही दारु ज्यांनी दारु प्राशनचा परवाना काढला आहे त्यानंच मिळणार आहे. यात देशी दारुसाठी एका दिवसासाठी दोन रुपये परवाना फिस असुन हा परवाना देशी दारु विक्री दुकानावरच वरच उपलब्ध आहे. तर विदेशी दारु खरेदीसाठी माञ महिन्याला शंभर रुपये तर अमर्याद कालावधीसाठी  एक हजार रुपये परवान फिस आकारली जात आहे. शुल्क घेतला जात  आहे यासाठी परवाना वितरण सुरु आहे. देशी दारु विक्री दुकानात अपेक्षित गर्दी दिसुन आली नाही कारण दोन महिन्यापासुन लाँकडाऊन असल्याने या मंडळीना कामच नसल्याने हाती पैसे न आल्याने येथे गर्दी दिसुन आली नसल्याचे समजते .माञ विदेशी दारु दुकांनावर परवाना धारकांनाच दारु विक्री होत असल्याने येथे  अपेक्षित उसळणारी गर्दी  झाली नाही माञ वर्दळ दिसुन आली.  येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तुळजापूर शहरात असणाऱ्या बसस्टँन्ड रोड व घाटशिळ वाहनतळ येथे दारु विक्री करणाऱ्या दुकानदारांनी दुकांनासमोर दारु विक्रीसाठी लाकडी बँरेकेटींग उभारल्याने सोशल डिस्टंन्स पाळुन दारु विक्री झाल्याचे  दिसुन आले.शहरात दोन विदेशी दारु विक्री , चार देशी दारु विक्री व दहा बियर बार आहेत येथे आज दारु विकली गेली.
 
Top