लोहारा/प्रतिनिधी
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त कृषी निविष्ठा बांधावर वाटप करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.परिणामी दुकानात व बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये,संचारबंदीचे पालन व्हावे,कृषी निविष्ठा गटामार्फत खरेदी कराव्यात व याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी सोमवार दि. १८ मे रोजी खत - बियाणे वाटप प्रसंगी केले.
खरीप पिकाच्या पेरणीसाठी बाजारात गर्दी करून नयेत.शेतक-यांना थेट बी-बियाणे बांधावर वाटप करण्यात येत आहे.तालुक्याच्या ठिकाणी जाणे ही बाब खर्चिक आहे.धावपळ, श्रम व पैसासह दगदगीतून त्यांची सुटका व्हावी यासाठी थेटपणे बांधावरच खत-बियाणे वाटप करण्याची मोहीम उमरगा कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.या शेतकरी बांधवांच्या खत-बियाणे वाटप प्रसंगी उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव,उमरगा कृषी अधिकारी सुनिल जाधव,कृषी सहाय्यक सुतार,बेळंब सरपंच महानंद कलशेट्टी,ग्रामपंचायत सदस्य महालिंग बाबशेट्टी,ग्रामसेवक आर.व्ही.जाधव,श्रीमंत मगे,चंद्रकांत बाबशेट्टी,सुर्यकांत सुर्यवंशी,अनिल बिराजदार,चाँद शेख आदींची उपस्थित होते. यावेळी बेळंब येथे बी-बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
 
Top