क्वारंटाईन न होणाऱ्या धर्मवेढया लोकांमध्ये केली जनजागृती
 गाेविंद पाटील /प्रतिनिधी-
भारत देश हा विविध भाषा,  राज्य, जाती, धर्म, पंत , संस्कृतीने नटलेला देश आहे.   जेंव्हा-जेंव्हा देशावर मोठ संकट आले, आणी
बाणीची परिस्थिती निर्माण झाली तेंव्हा-तेंव्हा भारत देशातील नागरिकांनी आपल्या देशावरील संकटाचा एकजुटने सामना करून त्या संकटाला मुळासगट संपविल्याचे आनेक उदाहरण, प्रसंग आपण अनुभवले, पाहिले असतील. सध्य स्थितीत भारत देशासोबत पुर्ण विश्वावर कोरोना नामक शुत्रूने हमला केला आहे. परंतु पुन्हा एकदा देशातील नागरिक आपले सगळे वाद विसरून एकजुटीने या कोरोना नामक शुत्रूचा सामना करीत आहे.  या लढाईत भारताने पुन्हा एकदा पुर्ण विश्वा समोर ठोस निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे. याचा आदर्श घेऊन उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावातील नागरिकांनी देखील कोरोना नामक शुत्रूला हरविण्यासाठी एक जुटीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे आता बेंबळी गावात कोरोना पार्श्वभुमीवर परिवर्तनाचे वारे वाहत असतानाचे चित्र दिसुन येत आहे.
तालुक्यातील बेंबळी गांवात सामाजिक कार्यकर्ते रणजीत बरडे यांनी गावात परिवर्तन होण्यासाठी तसेच विकासात्मक कामे , लोकांच्या समस्या, गावातील युवकांचे विचार जाणुन घेण्यासाठी फेसबुकवर बेंबळी विकास चर्चा या पेज चे निर्माण केले आहे. या माध्यमातुनच कोरोना पार्श्वभूमीवर गावात काय-काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात,नागरिकांनी आपल्या आरोग्य संदर्भात घ्यावयाची दक्षता या विषयावर  बेंबळी गावच्या विकासामध्ये अमुल्य, अनमोल योगदाने देणारे गावचे ज्येष्ठ पत्रकार तथा विधिज्ञ अॅड. उपेंद्र कटके यांच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन  गुरूवार दि. २१ रोजी सायंकाळी िठक ८ वाजता करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रणजीत बरडे यांनी केले होते.
या कार्यक्रमास बेंबळी ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देऊन आपल्या विविध समस्या संदर्भात अॅड. उपकेंद्र कटके यांच्याशी लाईव्ह संवाद असून कोरोना रोगाला गावापासून दुर ठेवण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाऊ शकतात, अथवा करण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात प्रश्न विचारून त्या नुसार कशा प्रकारे काळजी घेतली जाईल या विषयी सकारात्मक चर्चा केली. यावेळी गावातील नागरिकांनी, युवकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अॅड. कटके यांनी समाधान कारके उत्तरे देताना ते म्हणाले की,  कोरोना संदर्भात स्वताची, आपल्या कुटुंबाची, गावातील नागरिकांनी आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, परराज्यातुन अथवा पुणे-मुंबई आदी शहरातुन  जवळपास २ हजार लोंग गावात  आलेली आहेत. या  नागरिकांनी स्वताहुन त्याची माहिती आरोग्य विभागास देणे गरजेचे आहे, या बाहेरून आलेल्या लोकांना जर कोणी पाठीशी घालत असेल  तर संबंधित व्यक्ती व बाहेर गावावुन आपलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून दंड वसूल  करण्या   संदर्भात कठोर भूमिका घ्यावी, तसेच क्वारंटाईन न होणाऱ्या कांही धर्मवेढया लोकांनामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  तसेच प्रशासनातील कोणती ही व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी जर आपल्या कामामध्ये दिरंगाई करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद करण्यात आली आहे.
गावचे सरपंच, बेंबळी पोलिस, बेंबळीतील स्वास्थ्य विभाग पुर्ण ताकदीनिशी या कोरोना बीमारीचा मुकाबाला करीत आहेत. गावातील पत्रकार हे गावच्या विकासासाठी पुर्ण तळमळीने लिखान करीत असतात, परंतु मध्यंतरी गावातील कांही लोकांकडून पत्रकारांना टार्गेट करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात होता. हे गावाच्या उज्वल भविष्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी पत्रकारांच्या पाठीशी उभे राहने गरजेचे आहे.  गावच्या विकासाठी शासनाच्या विविध योजनाचा वापर करणे गरजेचे आहे. गावात एकखादे चांगले काम होत असेल तर त्यास विनाकरण विरोध करने चुकीचे आहे. १४ वित्त आयोगाच्या निधीतुन क्वारंटाईन कक्ष परिसरात व तेथील नागरिकांना भोजनाची सोय करणे, सॉनीटाझर उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे. तसेच गावातील सोसायटीच्या माध्यमातून गोर-गरीबांना व्यवस्थीतरित्या धान्याचे वितरण सोशल डिस्टसिंगचे पालन करून केले जात आहे. लवकरच गावातील तंज्ञ लोकांचे म्हणजेच गावातील यशस्वी उद्योजक चंदन भडगे , बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए.पी.आय शेख, आरोग्य अधिकारी डाॅ. सूर्यवंशी,डाॅ.आमोल गावडे,  सरपंच, ग्रामसेवक यांचे ही बेंबळी विकास चर्चा या माध्यमातून फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणे करून त्यांचे ही विचार गावातील नागरिकांना ऐकवास मिळतील, असे कटके यंानी सांगितले. सध्या कटके यांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा व्हिडीओ मोठया प्रमाणात सोशल मीडियावर वायरल होत आहे, आतापर्यंत अनेकांनी या व्हीडीओस लाईक करून आपली पसंती दर्शवली तर ९७ नागरिकांनी कमेट करून आपले प्रश्न विचारले. तसेच ७ जणांनी हा विडीओ शेअर केला व ,२७३९ लोकांनी हा विडीओ बघितला आहे. या कार्यक्रमाची चर्चा बेंबळी गावासह पुर्ण उस्मानाबाद जिल्हयात होत आहे. तसेच या उपक्रमाचे खूप कौतुक ही होत असून अशा प्रकारे भविष्यात उपक्रम राबविण्याची मागणी गावातील नागरिक करीत आहेत.

 
Top