कोरोना साथ काळात होमिओपॅथी औषध वितरणाला बेंबळीतुनच सुरुवात
गोविंद पाटील / प्रतिनिधी
आज होमिओपॅथी वेगाने वाढणारी आणि जगात सर्वत्र वापरली जाणारी संस्था आहे. हळुवारपणे होणा-या त्याच्या इलाजामुळे आणि सुरक्षित गोळ्यांमुळे होमिओपॅथीचा वापर भारतात घरोघरी दिसतो. साधारण अभ्यासाने असे लक्षात येते की भारतीय लोकसंख्येपैकी 10% लोक आपल्या आरोग्यासाठी पूर्णपणे होमिओपॅथीवर अवलंबून आहेत आणि देशातील दुसरी अत्यंत लोकप्रिय औषध प्रणाली म्हणून याकडे पाहिले जाते. एकाद्या रोगाचा समुळ नाश करण्यासाठी होमिओपॅथीचे उपचार फायदेमंद आहेत, अशी माहिती बेंबळी येथील भुमीपूत्र तथा होमिओपॅथी तज्ञ डाॅ. अमोल गावडे यांनी िदली.
गुरूवार दि. २८ मे रोजी ठिक रात्री ८ वा. डॉ.गावडे यांनी बेंबळी ग्रामस्थांशी लाईव्ह संवाद साधत या व्याख्यान कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफले. पुर्वीच्या दोन यशस्वी कार्यक्रमानंतर, या कार्यक्रमास ही ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळाला. कार्यक्रमावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गावडे यांनी अभ्यासपुर्ण उत्तरे दिली. डॉ.गावडे यांचे  तालुक्यातील केशेगांव येथे क्लिनिक आहे. ते वारंवार हाेमिऑपथीचे उपचार कसे फायंदेमद आहेत, या विषयी ते उस्मानाबाद तालुक्यासह जिल्हयातील नागरिकांना व्हीडीओच्या माध्यमातून जनजागृती करतात. लहान मुलांमधील डोळ्यातील तिरळेपणा कमी करणे, मुतखडा, अपचन, गॅसेस, केस गळती, कुष्ठरोग आदी विविध रोगांवर ते उपचार करतात. ते समाज कार्यात ही मोठे योगदान देतात. त्यांनी काेरोनाच्या पार्श्वभुमीवर पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टरांना रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या गोळयाचे वितरण केले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाची सर्वात प्रथम सुरुवात त्यांनी बेंबळी, केशेगावात राबवून केली. या उपक्रमाच्या बातम्या ही  प्रकाशित झाल्यानंतर   त्याच्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन   इतर होमिओपॅथी तज्ञांनी अशाच रोगप्रतिकारक शक्ती वाढींच्या गोळ्याचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला असल्याचे आम्हास पहावयास मिळाले.
आपल्या लाईव्ह व्याख्यानात डॉ.गावडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना सांगितले की,  होमिओपॅथी ही एक आदर्श उपचारपद्धती आहे  ती    ‘समः समं शमयति’ (काटयाने काटा काढणे ) या तत्त्वावर आधारित आहे.  त्यामुळे आजार लवकरात लवकर बरा होतो.  या पॅथीची उपचारपद्धती हळुवार आहे पण  या उपचार-पद्धतीने आजार मुळापासून बरा होतो.  होमिओपॅथी दुष्परिणामविरहित वैद्यकीय शास्त्र आहे.
होमिओपॅथिक औषधांची कार्यपद्धती संदर्भात डॉ. गावडे यांनी सांगितले की, होमिओपॅथिक औषधाची मात्रा जिभेवर पडताक्षणी ती शरीरातील रसद्रव्यात श्लेष्मल त्वचेवाटे व जठरामार्फत सर्वत्र पोहोचते. केवळ औषध हुंगण्याने सुद्धा ही क्रिया घडते. शरीरातील प्रत्येक अवयव व कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) तंतूमार्गे औषधि-क्रिया घडते व औषधाची शक्ती पसरते. त्वचेवरही द्रवस्वरूपाच्या औषधाची क्रिया घडते. समान लक्षणानुसार सूक्ष्म औषधाची मात्रा दिल्यानंतर तो समानलक्षणी असणाऱ्या नैसर्गिक रोगास काबीज करतो व तोपर्यंतचा शरीरातील नैसर्गिक रोगाने पछाडलेला भाग आपल्या हाती घेतो. नैसर्गिक रोगाचे अशा तर्‍हेने उच्चाटन झाल्यानंतर काही प्रमाणात औषधी रोग मात्र राहतो, परंतु तो इतका हलका असतो की, स्वतःच नाहीसा होतो. होमिओपॅथीने आजारा-तून मुक्ती शरीराच्या आतून-बाहेर, वरून-खाली व सुरुवातीस जी तक्रार उद्भवते ती सर्वांत शेवटी बंद होते.त्यामुळे हाेमिओपॅथी उपचार केंव्हा ही सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्याख्यान कार्यक्रमाचे निवेदन करताना अॅड. कटके यांनी त्यांना आलेला अनुभव सांगताना ते म्हणाले की, माझा मुलगा समर्थ याला डोळ्याच्या तिरळे पणाचा त्रास होवु लागला होता. या संदर्भात मी डॉ. अमोल गावडे यांचा सल्ला घेऊन त्याच्यावर होमिओपॅथिक उपचार सुरू केले. त्यामुळे मुलाचा तिरळेपणा कायमचा नष्ट झाला आहे. असाच एक प्रसंग मला ही वाटतो की, मी पत्रकार गोविंद पाटील व  पत्रकार अॅड. अमर कटके यांनी डॉ.आमोल गावडे यांच्या केशेगाव येथील क्लिनिक भेट दिली होती. यावेळी तेथे एका रूग्ण महिलेला होिमओपॅथिक उपचाराचा आलेला अनुभव जवळून पाहता आला. त्या रूग्ण महिलेला मुतखडयाचा त्रास होता. यावेळी डॉ. गावडे यांनी त्या महिलेच्या पतीला होमिओपथीचे औषधे देऊन त्याचे सेवन कसे करायाचे आहे याविषयी त्याला सांगितले होते.  त्याचे झाले, असे की, आम्ही डॉ. गावडे यांच्या क्लिनिक मध्ये डॉ. गावडे यांच्याशी चर्चा करीत होतो. यावेळी त्या मुतखडयाने पीढीत महिलेचा पती मोठया आनंदाने तेथे आला आणि त्याचे आभार मानू लागला व त्यांना पडलेला मुतखडा दाखवू लागला होता. या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार आहोत. यावरून आपण ठरवा  की, हे होमिऑपथी उपचार प्रणाली किती प्रभावी व किती कारगर आहे. लाईव्ह कार्यक्रमादरम्यान डॉ.गावडे यांनी  वेळोवेळी ग्रामस्थांना, जिल्हयातील नागरिकांना मार्गदर्शन करणार असल्याचे ही आश्वासन दिले. आत्तापर्यंत झालेल्या दोन कार्यक्रमाप्रमाणेच या ही कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. गावडे यांना १०२ नागरिकांनी प्रत्यक्षात कमेट द्वारे आपली प्रश्न विचारले तर हा व्हिडीओ शेकडो नागरिकांनी बघितला आहे.
 
Top