परंडा /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील खासगी डॉक्टराना फेस शिल्ड चे वाटप माजी आमदार राहुल मोटे यांच्या सूचने वरून तालुका अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष वाजीद दखनी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, शहराध्यक्ष अजय बनसोडे, प्रा.शरद झोंबडे सर, सचिन पाटील, नासीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच तालूक्यातील डोंजा,अनाळा, शेळगाव सर्कल मध्ये माजी जि.प.कृषी व पशसंवर्धन सभापती नवनाथ जगताप,माजी जि.प.सदस्य दत्तात्रय पाटील, तालुका अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना फेस शिल्ड वाटप करण्यात आले.
परंडा तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांना फेस शिल्ड पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उचलली आहे. याकामी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, डॉक्टर सेलचे जिल्हाअध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे,डॉ.सूरज मोटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.