उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या चार व्यावसायीकांवर रविवारी (दि.17) महसूलच्या पथकाने कारवाई करून दंड आकारला. रविवारी सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु, महसूल पथकाच्या पाहणीत मारवाडी गल्ली येथील गायत्री हॉटेल सुरू असल्याने त्यांना दोन हजार रुपये, जयश्री जनरल स्टोअर्स, भीमनगर 1 हजार रुपये, शाकीर किराणा दुकान, खाजानगर 1 हजार रुपये असा दंड करण्यात आला. तर बनसोडे किराणा दुकान स्मशानभुमी रोड याला कुलूप लावले.

 
Top