उस्मानाबाद /प्रतिनिधी-
देशावर आलेल्या संकटासाठी मुख्यमंत्री सहयता निधीला मदत म्हणुन प्रतेकजन आपल्या आपल्या परिने अर्थिक सहकार्य करत आहे.आशा प्रकारेच येडशी येथिल जनता विदयालयातील माजी विदयाथ्र्यांकडून मुख्यमंत्री सहयता निधीला 51 हजारांची मदत करण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सोपवण्यात आला.यावेळी जनता विदयालयाचे माजी विदयार्थी महेश टकले,गोपाळ लवटे,प्रताप घुटे यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील येडशी येथिल जनता विदयालयाच्या 1996 पर्यंत शिक्षण झालेल्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांनी मिळून मुख्यमंत्री सहयता निधीला 51 हजाराची मदत केली आहे.या पैकी बरेच विदयार्थी नैकरी करत आहेत तर काही व्यवसाय आणि शेतीसुध्दा करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संकटामध्ये असलेल्या सामान्य मानसाला या मुख्यमंत्री सहयता निधीमधुन मदत होणार असल्याने प्रतेक जण या मार्गाने मदत करत आहे. संकटात असलेल्यांना ही मदत मिळावी म्हणून जनता विदयालयाच्या माजी विद्याथ्र्यांने आपल्या आपल्या परीने मदत गोळा करूण 51 हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केला.
 
Top