उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी  वाशी पोलीस स्टेशनच्या एक  पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कॉन्स्टेबल, एक पोलीस वाहन चालक आणि एक खासगी इसम अशा चौघावर  वाशी पोलीस स्टेशनमध्येच रविवारी   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरमकुंडी येथे एसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांना ट्रॅकटरमधे मुरुमची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले. दरम्यान तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रूपयाची मागणी केली. तडजोडी अंती ४५ हजार रूपये मागणी करुन पहिला हफ्ता ३० हजार रुपये स्विकारल्यानंतर पीएसआयसह पोलिस कर्मचारी व  शासकीय वाहनचालक पसार झाले. याप्रकरणी वाशी पोलीस  स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खटाने,पोलिस नाईक सम्राट माने,  खासगी इसम बाळासाहेब बिभीषण हाके व अनोळखी वाहन चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी सापळा अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, लाच स्विकारणारे पळून गेले. दरम्यान तपास अधिकाऱ्यांना दुखापत  झाली. लाच स्विकारणारे पीएसआय, एक पोलिस कर्मचारी, शासकीय वाहन चालक हे शासकीय वाहनासह पसार झाल्याचे शेवटी समोर आले. अशी माहिती सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक जी. एस. पाबळे यांनी दिली आहे.
 
Top