गोविंद पाटील/प्रतिनिधी : -
तालुक्यातील बेंबळी येथे सध्या मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई व अन्य ठिकाणाहून नागरिक येत आहेत मात्र हे सर्वजण कोरनटाईन होण्या  ऐवजी बिनधास्तपणे समाजात वावरत आहेत आता अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई ही करण्यात येणार आहे यासंदर्भात सरपंच सत्तार शेख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून एकही रुग्ण न आढळल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु सोमवारी एक रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोन मध्ये झाला आहे. हा रुग्ण मुंबई येथून परंडा तालुक्यात आला. तो स्वतः कोरोना बाधित असल्यामुळे त्याचा सर्व गावाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा परंडा तालुक्यात संपूर्ण लोक डाऊन जाहीर केले आहे. सध्या बेंबळी गावातही अशाच पद्धतीचे अनेक लोक रेड झोन असलेल्या जिल्ह्यातून गावात येत आहेत. यांच्यामुळे संपूर्ण गावाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बेंबळी दक्षता समिती सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन या संदर्भात शासनाचे काय निर्देश आहेत या संदर्भात विचारणा केली. तेव्हा सरपंच सत्तार शेख यांनी तातडीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली.
यावेळी जिल्हा परिषद केंद्र प्रमुख बापू शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, ग्रामसेवक करपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार ॲड. उपेंद्र कटके, गोविंद पाटील, नितीन खापरे पाटील, शीतलकुमार शिंदे, रणजीत बर्डे, श्याम पाटील आदींनी लोक गावात आल्यानंतर नेमकी तक्रार कोणाकडे करावी याबाबत मार्गदर्शन विचारले. तेव्हा सरपंच सत्तार शेख यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून याबाबत कोणाची जबाबदारी आहे याचे निराकरण केले. प्रथमतः सरपंच शेख व अन्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले की कोणताही व्यक्ती अन्य जिल्ह्यातून आला असेल आणि त्याने आरोग्य विभागाला किंवा कोरूना सहाय्यता कक्षात माहिती दिली नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाणार. तसेच कोरोना सहाय्यता कक्षात उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांवर व कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्याबाबत शिफारस करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच कृषीव अन्य विभागातील उपस्थित राहणाऱ्या कर्मचा-‍यांवर ही कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आपल्या भागातील अंगणवाडी कर्मचारी तसेच आशा कार्यकर्तीना नागरिकांनी माहिती द्यावी. या दोघांनी संबंधित व्यक्तीला जिल्हा परिषद शाळेत स्थापन केलेल्या कोरुनटाइन वॉर्डमध्ये शीफ्ट होण्याचा सल्ला द्यावा.  संबंधित व्यक्तीने या दोघांचे ऐकले नाही तर यानंतर  या दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशालेमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना सहाय्यता कक्षात असलेल्या कर्मचाऱ्याला माहिती द्यावी. कोरोना  कक्षातील कर्मचारी व डॉक्टर सुरुवातीला त्या व्यक्तीस समजावून सांगतील. तरीही या व्यक्तीने येण्यास नकार दिला तर दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्याच्या कडून दोन हजार रुपये दंड वसूल करावा. यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार पालन करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी आपल्या गल्लीत किंवा शेजारी मुंबई व पुण्याहून तसेच अन्य जिल्ह्यातून एखादी व्यक्ती आली असल्यास याची माहिती प्रथमतः अंगणवाडी कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांना द्यावी, असे आवाहन सरपंच सत्तार शेख व बेंबळी दक्षता समितीच्या सदस्यांनी केले आहे.
 
Top