उस्मानाबाद  /प्रतिनिधी : -
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 11 मे 2020 रोजी जिल्ह्यातील 17 व्यक्तींच्या थ्रोट स्वाब चे नमुने घेण्यात आले होते. ते सर्व नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले होते. आज त्या सर्व व्यक्तींच्या स्वाबचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
 
Top