उस्मानाबाद /प्रतिनीधी
शिंगोली गावातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आमदार राणा दादा पाटील व उस्मानाबाद नगर परिषदेचे गट नेते युवराज बप्पा नळे यांच्या वतीने धान्याचे किट वाटप ! कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या गरीब नागरिकांचे अन्नाअभावी हाल होत आहेत.   या अनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगोली गावातील गोरगरीब, हातावर पोट असलेल्यां राशन न मिळणाऱ्या काही नागरिकांना जीवनावश्यक अन्न धान्याच्या किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद नगर परिषदेचे गटनेते युवराज बप्पा नळे, सरपंच येडबा तात्या शितोळे, उपसरपंच कुणाल वाघमारे, युवानेते राहुल शिंदे, दादा शिंदे, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते..

 
Top