तुळजापूर/प्रतिनिधी -
 शहरातील तुळजापूर खुर्द ते धारुर या रस्त्यावर असणाऱ्या जंगलातील  कडक उन्हाळ्या मुळे तहानेने व्याकुळ झालेले  वन्यप्राणी पाण्याचा शोधात गावांन कडे येताच येथे लावलेल्या शिका-यांचा जाळ्यात अडकत असल्याने नंतर यांना मारुन त्यांचे मांस विकले जात असल्याने या जगलांतील वन्य प्राणी वाचवण्यासाठी जंगलात पाणवटे पाण्याने त्वरीत भरण्याची मागणी वन्य प्रेमींन मधुन केली जात आहे.
तुळजापूर खुर्द ते मोर्डा ते धारुर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वनक्षेञ असुन हे वनक्षेञ रस्ता लगत असल्याने येथील वृक्षांची बेसुमार वृक्ष तोड केली जात असल्याने या वन क्षेञाचे क्षेत्र  महिनोमहिने  कमी होत जात आहे.या वनक्षेञात असणारे वन्य प्राणी सध्या उन्हाळ्यामुळे येथील पाणी क्षेञ आटल्याने तहानेने व्याकुळ झालेले हरणे, ससे, मोरे सह अन्य वन्यप्राणी गावांनसाठी असणाऱ्या पाण्याच्या क्षेञा कडे धाव घेत असुन येथे शिका-यांनी जाळे लावले असल्याने पाण्याचा शोधात आलेले वन्यप्राणी या जाळ्यात अडकत आहेत नंतर यांना मारुन त्याचे मांस विकले जात आहेत व यात हजारो रुपयाची दैनंदिन उलाढाल होत आहे.तसेच वन्यप्राणी मोठ्या संखेने मारले जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचा संखेत लक्षणीय घट झाली आहे तसेच येथे होणारी बेसुमार वृक्षाची तोड थांबविण्यासाठी तातडीनै योग्य ती उपाययोजना करावी येथे कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 
Top