तेर / प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे बांधावर खत वाटप योजनेचा शुभारंभ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीसाठी बी- बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे .परंतु कोरोना संसर्गामुळे टाळेबंदी आणि तालुक्याच्या ठिकाणाहून बी -बियाणे खरेदीसाठी येणारा खर्च त्यात वेळेचा अपव्यय होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तालुका कृषी विभागाने थेट बांधावर खते पोहोच करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे .यासाठी हिंगळजवाडी येथे कृषी सहाय्यक वैभव  लेनेकर यांनी  शेतकरी गट प्रमुख यांची बैठक घेऊन योजना समजावून सांगितली. कृषिधन शेतकरी गटाचे गटप्रमुख सुनील वाकुरे यांनी पुढाकार घेऊन दहा मेट्रिक टन खत एकत्रित खरेदी केले व शेतकऱ्यांच्या सोयीनुसार वाटप केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर,तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर जाधव ,कृषी अधिकारी सत्यजीत देशमुख, कृषी सहाय्यक वैभव लेनेकर ,कृषीधन गटाचे अध्यक्ष सुनील वाकुरे , दीपक शेंडगे, बब्रुवान वाकोरे, सुरेश नाईकनवरे, अनिल नाईकनवरे ,नेताजी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 
Top