वाशी / प्रतिनिधी -
 वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील बाहेरून आलेले तीनजण कोरोना बाधित झाल्याने या गावास आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, भाजपा नेते सुरेश कवडे यांच्यासह भेट देऊन तहसीलदार संदीप राजापूरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निळे, डाॅ. तांबडे, सरपंच मारूती माळी, पांडुरंग लावंड, रमेश सुकाळे, आशा कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून उपाययोजनांचा आढावा घेऊन खबरदारीच्या सूचना केल्या.
 तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी वाशी येथील ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती, उपाययोजना व तयारीचा आढावा घेतला. यावेळी डाॅ. संतोष पाटील, डाॅ. अमर तानवडे, भाजपा नेते सुरेश कवडे, तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, बबनराव कवडे, संजय साळुंखे व मुकुंद चेडे उपस्थित होते. 
 
Top