लोहारा/प्रतिनिधी
कृषी विभागाच्या वतीने लोहारा तालुक्यातील मौजे मोघा बु , मोघा खु, बेलवाडी, येथे खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी शेतकरी यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  कृषी सहाय्यक ओ. एच.पाटील यांनी सोयाबीन उगवण क्षमता तपासणे  व बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक सादर केले. व वी. बी. एफ पेरणी तंत्रज्ञानाबद्दल व खरीप हंगाम पूर्व तयारी बाबत सखोल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 
यावर्षी सोयाबीन बियाण्याची बाजारात टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शक्यतो घरचे सोयाबीन बियाणे पेरावे असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. पोकरा योजनेबाबत माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले.  उपस्थित शेतकऱ्यांनी सामाजिक सुरक्षित अंतर ठेवलयाचे व मास्क / रुमालाचा वापर केल्याचे पहावयास मिळाले. खते, बियाणे  व इतर निविष्ठा शेतकऱ्यांनी, शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित खरेदी कराव्यात व कृषी सेवा केंद्रावरील गर्दी टाळावी, असे सुचविण्यात आले.
 
Top