उस्मानाबाद / प्रतिनिधी -
येथील महाराणा प्रताप सिंह जयंती समारोह समितीच्या वतीने महाराणा प्रतापसिंह चौकामध्ये सकाळी 9 वाजता कोरोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.
राजपूत समाजातील भगतसिंह गहेरवार, राजेशसिंह परदेशी, राजेश पांडे, राजेंद्र अवस्थी,गोविंदसिंह राजपूत यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. महाराणा प्रतापसिंह चौकामध्ये प्रतिमा पूजनानंतर जयंती समारोह समितीच्या वतीने अजयसिंह ठाकुर,कृपाल सिंह ठाकुर, गणेश कवठे यांच्या वतीने उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
 
Top