उस्मानाबाद / प्रतिनिधी -
दरवर्षांप्रमाणे येणारी रमजान ईंद उत्साहाने संपन्न झाली. यंदाचे ईंदचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोना वायरसमुळे ईदगाह मैदानावर नमाज अदा न करता सामाजिक भान ठेवून प्रत्येकांनी आपआपल्या घरी ईदची नमाज अदा केली.ईदनिमित्त जिल्हाधिकारी िदपा मुधोळ मुढे, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी व्हीडीओ संदेशाच्या माध्यमातून लोकांना शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सध्या मंदीचे सावट असल्यामुळे यंदाची ईद साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
दरवर्षी हिंदु-मुस्लिम समाजातील लोक दिवाळी व रमजान ईंद या दिवशी एकमेकांना फराळाला बोलावितात. परंतू यावर्षी कोरोना वायरच्या तांडवामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे आनेकांनी घरघुती स्वरूपातच रमजान ईद साजरी केली. गेल्या मार्चपासून कोरोना वायरसने देशासह जगात खळबळ माजवली आहे. दोन महिने देशातील उद्योगधंदे बंद राहिल्याने आनेकांच्या सणांवर बंदीचे सावट जाणवत आहे.

 
Top