तुळजापूर /प्रतिनिधी-
कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर लग्न झालेले नवविवाहीत नवदांम्पत्य मोटार सायकलवरुन तिर्थक्षेञी येवुन राजेशहाजीमहाध्दार समोरून देविला जोडीने नमस्कार करुन  देवीचरणी पायरीवर लीन होवुन आपली वावरयाञा देवीदारी पुर्ण  करुन नव्या संसारास आरंभ करीत आहे.
कोरोनाचा फटका विवाह सोहळ्यांन बरोबरच नवदाम्पत्यांच्या वावरयांञानाही बसत असल्याचे दिसुन येत आहे. हिंदू धर्मियांनमध्ये शुभविवाह सोहळा झाले की, आपआपल्या कुलदैवतांची पुजाअर्चा करुन नव्या संसारास आरंभ करण्याची अनादीकालापासुन परंपरा ,प्रथा असुन ती आजही पाळली जाते. लग्न मोसमात दररोज हजारो नवदांम्पत्य सहकुंटुंब तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन देवीचा कुलधर्म कुलाचार करुन देवीचा  आशिर्वाद घेवुन आपल्या नव्या संसाराचा आरंभ करीत असत.
माञ ऐन लग्न सोहळ्यांचा तिथी कालावधीत कोरोना आला नंतर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आले. या काळात अनेकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकले त्यानंतर दुसरा वावरयञेचा विधी नवदांम्पत्य मोटार सायकलवरुन दोघे तिर्थक्षेञ तुळजापूर गाठत असुन कुठलाही कुलधर्म कुलाचार न करता जोडीने देवीसमोर राजेशहाजीमहाध्दारच्या पायरीवर नतमस्तक होवुन देवीचा आशिर्वाद घेवुन आपल्या गावी जावुन नव्या संसारास आरंभ करीत आहेत.
या नवदांम्पत्य मंडळी ध्ये शहरी भागातील ऐकही नसुन ग्रामीण भागातील तेही आसपासच्या गावातील नवदांम्पत्यांचाच समावेश आहे कारण शहरी भाग पुर्णता लाँकडाऊन असुन फक्त ग्रामीण भागात लग्न सोहळे संपन्न होत आहेत, सध्या तिर्थक्षेञ तुळजापूरात दररोज अशी पंचवीस च्या आसपास नवदांम्पत्य वावरयाञेसाठी येत आहेत. या मंडळीना पोलिस हटकत आहेत , माञ नवदांम्पत्य असल्याची खात्री करुनच मग त्यांना मंदीराकडे माणुसकीच्या नात्याने सोडले जात आहे.
 
Top