उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी  कोविड-19 या विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होवू नये. यासाठी बँकेत गर्दी न करता पिक कर्ज वितरणासाठी गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव यांच्याकडे पिक कर्जासाठी सरल फॉर्म भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह देण्यात यावा. पिक कर्ज वितरणाशी संबंधित कोणतीही अडचण, समस्या असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी किंवा गटसचिव यांच्याशी संपर्क साधून अडचणीचे निरसन करुन घ्यावे व पिक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी , उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20 मे 2020 रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व बैठकीमध्ये सन 2020-21 च्या पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता जिल्हयातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्रामीण बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकाकडून दि. 15 मे 2020 अखेर जिल्ह्यात एकूण लक्षांकाच्या तुलनेत फक्त 10 टक्के पिक कर्ज वाटप झाल्याने जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
 
Top