उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना विषाणू या संसर्गजन्य कोव्हिड 19 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा हा नॉनरेड झोनमध्ये येत असल्याने महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यात राज्य परिवहन बस वाहतुकीसाठी 50 टक्के आसन क्षमतेवर जिल्हांतर्गत वाहतूक सुरू करण्यास जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी परवानगी दिलेली आहे.
ही वाहतूक उस्मानाबाद विभागातील उमरगा, भूम व परंडा या आगाराकडून खालील दिलेल्या मार्गावर दि.22 मे 2020 पासून चालविण्यात येणार आहेत.
  उमरगा आगार :- 1) उमरगा ते लोहारा बेंबळी  ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 7.30, 9.00, 10.00, दुपारी 1.00 , 2.00, 3.00 , 4.00 अशी राहील.            2) उमरगा ते लोहरा सास्तूर नारंगवाडी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 9.30, दुपारी 2.00 , सांय 5.30 अशी राहील.  3) उमरगा ते माकणी दाळींब ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.45, 10.15, दुपारी 2.00, सांय. 5.00 अशी राहील. 4) उमरगा ते मुरुम कंटेकुर ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 7.00, 8.00, 10.30, 11.30, दुपारी 1.00, 2.00, सांय 5.00, 6.00 अशी राहील. 5) उमरगा ते डिग्गी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 8.30, 10.00, 11.30, दुपारी 1.00 , 2.30, 4.00, सांय 5.30 अशी राहील. 6) उरमगा ते नळदुर्ग ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 9.00, 11.00, दुपारी 1.00, 3.00, सांय. 5.00 अशी राहील. 
भूम आगार :- 1) भूम ते येडशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 8.00, 10.00, 11.00, दुपारी 1.15, 2.15, 4.15 , सांय 5.15 अशी राहील. 2) भूम ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.15, 11.15, दुपारी 1.30, 3.15, सांय 6.15 अशी राहील. 3) भूम ते ईट ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.10 , 9.50 , 11.30 , दुपारी 1.30, 3.10 , 4.50 , सांय. 6.30 अशी राहील. 4) भूम ते पाथ्रुड ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 10.15, 11.45, दुपारी 1.30, सांय. 6.00 अशी राहील.           5) भूम ते तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, दुपारी 3.00 अशी राहील.  6) येरमाळा ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, 11.00, दुपारी 12.45, 2.30, 4.00 अशी राहील.  7) भूम ते देवळाली ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, सांय. 6.30 अशी राहील. 8) भूम ते येरमाळा ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 11.45, दुपारी 2.30 अशी राहील.
 परंडा आगार :- 1) परंडा ते वारदवाडी भूम ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 10.00, दुपारी 1.00, 4.00 अशी राहील. 2)  परंडा ते आनाळा भूम ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 7.30, सांय. 5.00 अशी राहील. 3) परंडा ते पाथ्रुड ही बस सुटण्याची वेळ सकाळी 10.45, दुपारी 2.00 अशी राहील. 4) परंडा ते डोणजा तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.00, सांय. 5.30 अशी राहील. 5) परंडा ते आनाळा तांदुळवाडी ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 11.00, दुपारी 2.30 अशी राहील, असे विभाग नियंत्रक,  राज्य परिवहन, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top