तुळजापूर /प्रतिनिधी-
येथील कोरोना बाधीत  रूग्ण सापडलेल्या भागास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने भेट देवुन आवश्यक त्या सूचना देऊन  भागातील मंडळींना सर्वती मदत करण्याचे आवाहन केले.  नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, घरा बाहेर पडू नये व घाबरून जावु नये, असे आवाहन केले.
यावेळीतहसिलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी  आशिष लोकरे, नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, औदुंबर दादा कदम, विशाल  रोचकरी,  अनंद कंदले, शांताराम पेदे, श्रीनाथ शिंदे  आदी उपस्थित होते.

 
Top