उस्मानाबाद / उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आवश्यक त्या केलेल्या उपायोजनांची खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदु  राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी करण्यात आली
 यावेळी खासदार  ओमराजे यांनी आणखीन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाने करावी. या भागातील नागरिकांनी हि प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
 यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी,उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलिस निरिक्षक श्री. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एवळे, नगरपालिका मुख्याधिकारी  बाबासाहेब मनोहरे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
 
Top