उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना स्थिर आकार रद्द करून वीज दर कमी करण्यात आले असल्याचे नागपूर येथील पत्रकार परिषदेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खोटी व फसवी घोषणा करून राज्यातील वीज ग्राहकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे .
प्रत्यक्षात राज्यातील लघुदाब व उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांची स्थिर आकारणी करोना महामारी मुळे 3 महिने तात्पुरती स्थगित ठेवावी असे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत .तात्पुरती स्थगिती देणे म्हणजे रद्द करणे नव्हे. ही आकारणी 3 महिन्यानंतर ग्राहकांच्या बिलामध्ये येणारच आहे. तसेच त्या रकमेचे व्याज पुढील वीजदर निश्चिती मध्ये वसूल केले जाणार आहे ,तसेच वीजदर सरासरी 7% नी कमी झाले आहेत. आयोगाने जे निर्णय जाहीर केले तेच निर्णय सरकारचे नसताना सरकारने घेतल्याप्रमाणे ऊर्जामंत्री पुन्हा पुन्हा सांगत आहेत. लॉक डाऊन कालावधीत स्थिर आकार पूर्णपणे रद्द करावा अशी जनता दल मागणी करत आहे. त्यानंतर हीच मागणी पुन्हा राज्य सरकारने अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनासाठी नियुक्त केलेल्या 7 सदस्य मंत्री समितीकडे दि 23 एप्रिल रोजी केली आहे .याबाबत राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने आज अखेर कोणताही निर्णय घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे, तरीही ऊर्जामंत्री अशा प्रकारचे वारंवार खोटे विधान करून राज्यातील वीज ग्राहक व जनतेमध्ये अनावश्यक संभ्रम निर्माण करत आहेत. वीजदरात सरासरी 7% टक्के कपात केल्याचा दावा पूर्णपणे फसवा आहे. फेब्रुवारी 20 20 चा ‘न भूतो न भविष्यती’ असा इंधन समायोजन आकार 1.05  रुपये प्रतियुनिट मूळ सरासरी देयक दारात समाविष्ट केला आहे .त्यामुळे 2019 20 च्या सरासरी देयक दर 6.85 रुपये प्रतियुनिट ऐवजी 7. 90 रुपये प्रति युनिट गृहीत धरलेला आहे व हा देयक दर 7. 90 वरून 7. 31 रुपये प्रति युनिट वर आणला म्हणजे दर कपात केली असे दाखविले गेले आहे .प्रत्यक्षात सरासरी देयक दर 6. 85 रुपये प्रतियुनिट वरून 7. 31 प्रति युनिट याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. ही दरवाढ 0. 46 रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी 6.7 टक्के होते .त्यामुळे आता स्थिर आकार रद्द करणे व वीजदर कमी करणे ऐवजी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना मोफत वीज पुरवठा करण्याची जनता दल सेक्युलर मागणी करत आहे.
 
Top