उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन यानिमित्त पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8.00 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव उपस्थित होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. फक्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहिदांना स्मृती स्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
Top