उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना या महाभंकर रोगापासून  उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशातुन  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी  वेळोवेळी ठोस निर्णय घेऊन आपल्या नेतृत्व गुणांची ओळख  जिल्हावाशियांना करून दिली. त्यामुळे जिल्हावाशियामध्ये समाधाचे वातावरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन उस्मानाबाद शहरातीलच मैंदरकर दाम्पत्याने आपला ५० वां लग्नाचा वाढदिवस शहरातील कुष्ठरोग्यांसोबत साजरा केला.
अर्चना व नंदकुमार मैंदकर या दत्पतींने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कुष्ठधाम येथे जाऊन त्यांना अन्नदान करून त्यांना कोरोना रोगां पासून कसे संरक्षण करावे, स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले. अन्नदान करते वेळी त्यांचा मुलगा सचिन मैंदरकर,जैलेश
मैंदरकर,सून नेहा मैंदरकर, स्वाती मैंदरकर, राखी मैंदरकर व नातवंडे निशा, वैभवी, कृष्णा, शुभम,ऋतुजा, नारायणी,गौरी,अद्विक यांच्यासोबत संपुर्ण मैंदरकर परिवार उपस्थितीत होता.  मैंदरकर परिवाराकडून चालविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
Top