तेर (प्रतिनिधी)
गेल्या चार दशकांपासून काही शेतकऱ्यांनी अतीक्रमंण केल्याने बांधावर झाडे  झुडपे वाढले होते. त्यामुळे वाद निर्माण होत होता  .हा  दीड किलोमीटर लांबीचा शेतरस्ता स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नातून  मोकळा करण्यात आला .अखेर चाळीस वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
तेर ता .उस्मानाबाद येथील सुमारे 35 शेतकऱ्यांना नंबर बांधावर मोठ मोठे झाडे झुडपे वाढल्याने  शेतात जाण्यासाठी शेतरस्ता नव्हता . डकवाडी कोळेवाडी रस्त्याच्या मध्ये शेतजमिनी असणाऱ्या जवळपास 35 शेतकऱ्यांना नंबर बांंधावर झाडे उगवल्यामुळे जाणे येणे विनाकारण वाद निर्माण होत होता.
त्यामुळे तेर  येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या मध्यस्थीने  व तलाठी श्रीधर माळी  ,तंटामुक्त गाव समितीचे सदस्य जुनेद मोमीन, संजय नाईकवाडी राजशेखर नाईकवाडी, भास्कर माळी, मंगेश फंड उध्दव नाईकवाडी, भारत नाईकवाडी ,रवीराज चौगुले,  बालाजी पांढरे  यांच्या  प्रयत्नातून शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून हा जे.सी.बी.ने हा रस्ता तयार केला .त्यामुळे चाळीस वर्षे अडकलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top