परंडा /प्रतिनिधी -
 परंडा येथील नागरिक व उस्मानाबाद  ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल युसुफ बाशामियाँ शेख ( वय ५१ ) ८ एप्रिल रोजी कोरोना विषाणुजन्य परिस्थितीत लॉक डाऊन काळात ऑन ड्युटी असताना शिंगोली ते उस्मानाबाद प्रवासात असताना त्यांना हार्टअटॅक (ऱ्हदय विकार )आला होता.त्यांना तात्काळ सोलापूर येथे नेण्यात आले होते.सोलापुर यशोधरा हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर  ते दीड महिना होते. परंतु उपचार सुरु असताना गुरुवारी ( दि. २१ ) पहाटे त्यांचे निधन झाले.परंडा येथे आज दर्गाह दफनभूमित त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलं ,यातील एक मुलगी विवाहीत असून त्यांना चार भाऊ ,आई असा परिवार आहे.
 
Top