परंडा /प्रतिनिधी -
खंडेश्वरवाडी ( ता.परंडा) येथील दोन कोरोना बाधित झाल्याने या गावास आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दि.२० बुधवार सायंकाळी भेट देऊन आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे,सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांच्याशी खबरदारी घेणेबाबत चर्चा करून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
  परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयातून आज सरणवाडी येथील रूग्ण बरा होऊन घरी गेला.तर खंडेश्वरवाडी येथील २, भूम तालुक्यातील पन्हाळवाडी १, गिरवली १ अशा ४ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरु आहेत. हे पाचही रूग्ण मुंबईहून आलेले आहेत. आज रात्री खंडेश्वरवाडी येथील रूग्णांच्या संपर्कातील २२+१=२३ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जातील.
 आमदार ठाकूर स्वतः प्रशासनासह परिस्थितीवर लक्ष ठेवून पूर्ण खबरदारी घेत आहेत.नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच कुटुंबियांसह सुरक्षित रहावे असे आवाहनही केले आहे.
 
Top