तुळजापूर /प्रतिनिधी-
शहरातील एक २६ वर्षिय युवती जी की मरणाच्या दारी पोहचाली होती तिला कोरोना विरोधात  लढणा-या पोलीस अधिकारी , डाँक्टर,  कोरोना रुग्णालयात स्वयखुषीने काम करणारा स्वयंसेवक   व मेडिकल चालक व एक शहरवासीय यांनी संकट काळात तीला मदतीचा हात देवुन जीवनदान देऊन माणुसकी चे  दर्शन घडविणारी ही घटना  स्ञी शक्तीतुळजाई नगरीत घडली. विशेष म्हणजे मदतीचा हात देणाऱ्या या मंडळी नी स्वताचे नाव जाहीर होवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही या देवदुतांना आम्ही शोधुन काढुन त्यांनी केलेल्या अमुल्य कामाची दखल घेतली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, शहरातील एका गरीब वस्तीत राहणारी २६ वर्षिय महिला बाळंतपणासाठी उपजिल्हारुग्णालयात दाखल झाली ती प्रसुत झाली त्यानंतर तिला डिस्चार्ज देणे भाग असतानाच तिची प्रकृती ढासळली असता तिची तपासणी डाँ. अमित शिरसीकर यांनी केली.  तिचा एच पी  खूप कमी म्हणजे  चार  वर आला होता तिला रक्त दिल्या शिवाय तिचे प्राण वाचणे अशक्य होते. यावेळी तिथे स्वयंखुषीने कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या स्वयंसेवक असलेल्या  हर्षल  क्षिरसागर यांनी ही माहीती कळताच त्याने ही माहीती तुळजापूर पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या एपीआय सुशील प्रल्हाद चव्हाण यांना सांगितली  त्यांनी तात्काळ दोन रक्ताचा बाटल्या आणण्यासाठी स्वताचा खिशातुन पैसे काढुन  हर्षल यांना दिले. हर्षल ने लगेच उस्मानाबादला गेला त्यावेळेस रुग्णाचा नातेवाईक शिवाय  रक्त देता येत नसल्याचे सांगताच मी तिचा भाऊ असे सांगुन त्यांनी पैसे देवुन दोन रक्त बाटल्या घेतल्या तो पर्यत तिला डाँ शिरसीकर यांनी आपल्या खाजगी रुग्णालयात आणुन तिला रक्त चढवुन  तीच्यावर उपचार केले.  सध्या त्या गरीब असाह्य महिलेची प्रकृती चांगली आहे. या काळात या महिलेला मेडीकल चालक लोखंडे व टिंगरे या व्यक्तींनी मदत केली .विशेष म्हणजे या चौघांनी मदतीची वाच्यता कुठेही केली नाही. परंतु या महिलेला आणखी मदतीची गरज आहे

 
Top