तेर (प्रतिनिधी)
कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आयुर्वेदिक आर्सेनिक एल्बम 30 गोळ्याचे वाटप संजय इंगळे यांच्या वतीने 100 बाँटल चे वाटप करण्यात आले.
सरपंच नवनाथ नाईकवाडी , जि .प.चे माजी सदस्य नवनाथ इंगळे ,कोरोना कक्ष प्रमुख गोरोबा पाडूळे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे , प्रभाकर शिंपले  ,श्रीमंत फंड आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. शनिवार दि.23 रोजी कोरोना संसर्गजन्य महामारी रोखण्यासाठी प्रत्यक्ष जनतेत काम करणारे आशा स्वंयसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती,  सेविका ,ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी, पत्रकार यांना या बाँटल वाटप करण्यात आले. एका बाँटल मध्ये 160 गोळ्या आहेत.
या गोळ्यांचे 5000 बाँटल उपलब्धतेनुसार पुढील आठवड्यात  जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे  सुपूर्द करण्यात येत असल्याचे नवनाथ इंगळे यांनी सांगितले .

 
Top