उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, उस्मानाबाद यांनी अहवाल दाखल करुन उस्मानाबाद शहरात दिवसेंदिवस ग्रामिण भागातून येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत असून मुख्य बाजापेठेतील रस्ते हे त्या मानाने कमी रुंदीचे आहेत. त्यामुळे नमुद रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. तसेच उस्मानाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेमधील टिळक चौक ते माऊली चौक या परिसरात कापड दुकाने, सराफ लाईन व इतर दुकाने असल्याने व सदर रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतुक कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी खालील मार्गाप्रमाणे उस्मानाबाद शहरातील मुख्य बाजार पेठेमध्ये आगमन व निर्गमन नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावित केले आहे.
 उस्मानाबाद शहरातील खालील भागामध्ये खरेदीसाठी मोठया प्रमाणमध्ये गर्दी होत आहे. खरेदीस जाताना नागरीक आपली वाहने वाहतुकीसाठी वापरत असल्याने तसेच हे रस्ते अरुंद असल्याने खालील मार्गावर वहातूकीची कोंडी होत आहे. ज्यामुळे नागरीकांची गैरसोय होते.  तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खालील मार्गाप्रमाणे उस्मानाबाद शहरात वाहने आगमन व निर्गमन नियोजन करणे आवश्यक असल्याचा अहवाल सादर केला आहे.
वाहतूकीचे मार्ग :- 1. टिळक चौक ते माऊली चौक, काळा मारुती चौक मार्गे एकेरी वाहतुक 2. काळा मारुती चौक ते जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद कडे एकेरी वाहतुक 3. सावरकर चौक ते जलाराम फुटवेअर मेन रोड एकेरी वाहतुक 4. माऊली चौकाकडून काळा मारुती मार्ग टिळक चौकाकडे प्रवेश बंद 5. जिल्हा शासकीय रुग्णालय ते काळा मारुती चौक प्रवेश बंद  6. निंबाळकर गल्ली, श्री शिवाजी तरुण गणेश मंडळ ते राजेद्र वॉच सेंटर प्रवेश बंद 7. वस्ताद लहुजी साळवे चौक ते औषध भवन एकेरी वाहतुक 8. औषध भवन ते एस.बी.आय. बँक मार्गे मिनाक्षी ट्रेडर्स मार्गे मेन रोड कडे एकेरी मार्ग 9. औषध भवन ते वस्ताद लहुजी साळवे चौकाकडे प्रवेश बंद 10. एस.बी.आय. मेन रोड ते मिनाक्षी ट्रेडर्स मार्गे औषध भवन प्रवेश बंद   
नो पार्कींग झोन 1. टिळक चौक ते माऊली चौक सम विषम तारखांना पार्कीग करणे. टिळक चौकाकडून जाताना डावीकडे सम आणि उजवीकडे विषम.2. वस्ताद लहुजी साळवे चौक ते औषध भवन दक्षिण बाजूस दुकानाच्या समोर नो पार्कींग.
  उस्मानाबाद शहरातील मुख्य बाजार पेठेत टिळक चौक ते माऊली चौक या परिसरात कापड दुकाने, सराफा लाईन व इतर दुकाने असल्याने व रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोडी होत असल्याने, नागरीकांना येण्याजाण्यास अडचणी निर्माण होत आहेत, करिता उस्मानाबाद शहरातील वर नमुद तक्त्याप्रमाणे प्रस्तावीत प्रमुख मार्गावरील वाहतूक उपरोक्त मार्गाने वाहने कायमस्वरुपी वळवणे बाबत नियोजन केल्यास, व सार्वजनीक उपद्रव दुर करण्या करीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 133 नुसार वाहतुकीचे नियोजन केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, गर्दी होणार नाही व नागरीकांची गैरसोय होणार नाही. करीता उस्मानाबाद शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक उपरोक्त मार्गाने वळविणे व सार्वजनिक उपद्रव दुर करण्या करीता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम  133  (1) (अ) व (फ) (1)  आणि  (2)  नुसार आदेश निर्गमित करणे आवश्यक असल्याने उपविभागीय दंडाधिकारी रामेश्वर रोडगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 133  (1) (अ) व (फ) (1)  आणि (2) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन, उपरोक्त परिशिष्ट  मध्ये नमुद नुसार प्रमुख मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे तसेच पार्कींग झोन व्यवस्थेबाबत आदेशित केले आहे.   
या आदेशाचे तंतोतंत अनुपालन व्हावे. या बाबत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वाहतुक शाखा, उस्मानाबाद यांनी कार्यवाही करावी व वेळोवेळी अनुपालन अहवाल सादर करावा. सदर कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास त्याचे विरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 18 मे, 2020 पासून पुढील आदेशा पर्यंत कायम राहील. हा आदेश आज दिनांक 12 मे, 2020 रोजी उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांनी निर्गमित केलेला आहे.
 
Top