उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यात ‘कोरोना’चा एकही पॉझिटिव्ह रूग्ण नसल्याने जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. अशा जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाने वृत्तपत्र विक्री जसे की, स्टॉल, दुकाने, घरोघरी वाटप व विक्रीस परवानगी दिलेली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातही वृत्तपत्र घरपोच देण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे सोमवारी (दि.१९) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा आदींची स्वाक्षरी आहे.
 
Top