उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने समाजातील गरजु व आर्थिक दुर्बल कुटुंबासाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे 200 कीट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सुपुर्त करण्यात आले.
‘कोरोना’ संकटामुळे समाजातील बऱ्याच वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे, याची जाण ठेऊन केवळ व्यवसाय हे धेय्य डोळ्यासमोर सामाजीक बांधलकीची जपनुक करत व्यापारी महासंघाच्या उस्मानाबाद शाखेने किराणा वस्तुच्या 200 किट आज जिल्हा प्रशासनाच्या हवाली करण्यात आले,या पूर्वीही उस्मानाबाद तहसील मार्फ़त गरजु कुटुंबाना मोफत धान्य वितरित करण्यात आले होते.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या या मदती बद्दल जिल्हाधिकारी यांनीआभार मानले व किटचा दर्जा पाहून समाधान व्यक्त केले .
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शीरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी सह नियोजन अधिकारी रेड्डी यांची उपस्थिति होती. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव ,उपाध्यक्ष संजय मोदानी ,धनंजय जेवलीकर, अभय राजे यांची उपस्थिति होती

 
Top