कळंब/प्रतिनिधी -
सध्या कोरोना विषाणूच्या झळा शहरासह ग्रामीण भागातही चांगल्याच प्रकारे बसत आहेत. काही वृद्धांची मुले उपजीविकेसाठी पुणे, मुंबई येथे अडकलेले आहेत. तर काहीना कुणाचाच आधार नाही अशा व्यक्तिंना तालुक्यातील सौदणा अंबा येथे निराधार वृध्द असलेल्या गरजुवंताना मोफत धान्य किटचे गावातील पांडुरंग गायकवाड, अशोक पालकर व पत्रकार परमेश्वर पालकर यांच्याकडून गावचे सरपंच दामोदर देवकते, ग्रामसेवक श्रीमंत जगदाळे,, भारत पालकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबरूवान गायकवाड यांच्या हस्ते सोमवारी वाटप करण्यात आले.यावेळी सोशल डिस्टन्स पाळत हे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप पालकर, केशव गायकवाड, विलास पालकर, गोविंद काळे, विक्रम गायकवाड, अरुण पवार आदी उपस्थित होते.
 
Top