परंडा /प्रतिनिधी
 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी अशी ५,००० / - पाच हजारांची मदत ही मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये तालूक्यातील भारतीय स्टेट बॅक शाखा सोनारी येथे दि. ४ एप्रिल रोजी जमा केली आहे.अशी माहीती अरुण बुरांडे यांनी दिली आहे.
 संपूर्ण जगभर सध्या कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.या महासंकटाच्या विरोधात सारे जग लढत आहे. या विषाणूचा प्रभाव आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेला फैलाव रोखण्यासाठी शक्य ते सारे उपाय योजले जात आहेत.
गरीब कुटुंबात जन्मलेले अरूण बुरांडे हे समाजसेवेत सदैव तत्पर असतात.ते भारतीय स्टेट बॅक सोनारी येथे कार्यरथ आहेत.परंडा येथे श्री स्वामी समर्थ येथे राहत असून ते धार्मिक कार्यकमात अग्रेसर असतात सर्व काही कार्यक्रम स्वतःपुढे होऊन करतात ते आर्थिक झळीचा देखील कधी विचार करत नाहीत ते उत्तुंग प्रकारे किर्तन तबला व पेटी वाजवतात .या महाभयंकर संकटाला तोंड देताना आपल्या कुंटुबाची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये मी खारीचा वाटा उचललेला आहे. प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास निश्चितपणे आपण सर्वजण कोरोना या संकटाला परतून लावू माझा विश्वास आहे. कोरोना हरणार आपण जिंकणार.जनतेने दक्ष रहावे, काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे देखील अरूण बुरांडे यांनी म्हटले आहे.
यावेळी धनादेश देताना भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी अंजुम पठाण, मोहन दिवान ,अभय काटुळे आदी उपस्थित होते.

 
Top